ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
बेलगाव कुऱ्हे गावापासून जिल्ह्याचे ठिकाण नाशिक सुमारे 25 कि.मी. अंतरावर आहे. बेलगाव कुऱ्हे गावापासून तालुक्याचे ठिकाण इगतपुरी सुमारे 27 कि.मी. अंतरावर आहे. बेलगाव कुऱ्हे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1005.15 हेक्टर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बेलगाव कुऱ्हे गावाची एकूण लोकसंख्या 1291 आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 235 कुटूंब बेलगाव कुऱ्हे गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार गावात पुरुषांची संख्या 662 असून महिलांची संख्या 629 आहे. बेलगाव कुऱ्हे हे गाव पशुपालन व दुध व्यवसायात प्रसिद्ध आहे , इगतपुरी तालुक्यात व नाशिक शहरात सर्वाधिक दुध पुरवठा करणारे गाव म्हणून बेलगाव कुऱ्हे हे गाव प्रसिद्ध आहे . तसेच गावालगत गोंदे व वाडीवऱ्हे ह्या MIDC आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे . गावामध्ये सुविधा :- तरुणान साठी व्यायाम शाळा , वाचनालय , जिल्ला परिषद प्राथमिक शाळा , जनता विद्यालय अस्वली शाळा , प्राथमिक आरोग्य केंद्र , कार्यक्रम साठी हॉल , घरापर्यंत पाणीपुरवठा इ सुविधा नी गाव परिपूर्ण आहे .
प्राथमिक आरोग्य केंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) ही आरोग्य व्यवस्थेतील सर्वात खालची पातळी असून, ती दुर्गम भागातील लोकांपर्यंत मूलभूत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे . या केंद्रांमध्ये प्रतिबंध, उपचार, आरोग्य शिक्षण आणि पुनर्वसन यासारख्या सेवा पुरवल्या जातात. मुख्य कार्ये: • समुदायाला आरोग्य सेवा पुरवणे: व्यक्ती, कुटुंब आणि समुदायाला आवश्यक आरोग्य सेवा देणे हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. • प्रतिबंधात्मक सेवा: रोग प्रतिबंधक औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण देऊन रोगांचा प्रसार रोखणे. • उपचार सेवा: सामान्य आजारांवर उपचार करणे आणि गरज पडल्यास पुढील संदर्भासाठी रुग्णांना मोठ्या आरोग्य केंद्रांमध्ये पाठवणे. • माता आणि बाल आरोग्य सेवा: गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी विशेष आरोग्य सेवा. • पाणी आणि स्वच्छता: सुरक्षित पाणी आणि मूलभूत स्वच्छतेची सोय करणे. रचना: • एक प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणपणे एका मोठ्या गावात असते. • प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राखाली ५-६ उपकेंद्रं असतात, जी अत्यंत ग्रामीण भागातील लोकांसाठी सेवा देतात. • या केंद्रात डॉक्टर, नर्सेस, कंपाउंडर आणि इतर आरोग्य कर्मचारी काम करतात. • महत्त्व: • लोकांना घरबसल्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होते. • आरोग्य व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे आरोग्य आणि कल्याणाची खात्री होते.
बेलगाव कुऱ्हे २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1291 |
| घरांची एकूण संख्या | 235 |
| महिला लोकसंख्या % | |
| एकूण साक्षरता दर % | |
| महिला साक्षरता दर % | |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | |
| कार्यरत लोकसंख्या % | |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |